’क्रांतिसिंह नाना पाटील’ हे संपादित पुस्तक...नाना पाटील यांना लहानपणापासून असलेली सामाजिकतेची जाण व गोरगरिबांविषयी असलेला विशेष कळवळा...किंबहुना, गरिबांच्या कल्याणाची तळमळ हेच त्यांच्या जीवनकार्याचे सूत्र...महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव...महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग...1942मध्ये तलाठ्याची नोकरी सोडून काँग्रेस पक्षात सामील होऊन स्वातंत्र्यलढ्यात मारलेली उडी... इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारल्यामुळे अनेक वेळा सोसावा लागलेला तुरुंगवास...सुमारे चार वर्षे भूमिगत राहून सुरू ठेवलेले कार्य...सातारा जिल्ह्यात स्थापन केलेले प्रति-सरकार)...महात्मा गांधींच्या मनातील ग्रामराज्याचा राबवलेला प्रयोग...भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेच्या मागे लागलेल्या काँग्रेसमधील अनेक नेत्यांमुळे सुराज्य स्थापनेच्या संदर्भात पाटील यांचा झालेला भ्रमनिरास...गोरगरीब, शेतकरी व कामगार यांच्यावरील शतकानुशतकाची राजकीय, सामाजिक, आर्थिक व मानसिक गुलामगिरी नष्ट करणे हे क्रांतिसिंह नानांच्या जीवनकार्याचे मूळ सूत्र...त्यामुळे शेतकरी व कामगार पक्षात प्रवेश करून पुढे सुरू ठेवलेले कार्य... पुढे कम्युनिस्ट पक्षात प्रवेश...गावोगावी जाऊन केलेली भाषणे...नाना पाटील यांचे जीवन व कार्याचा सविस्तर परिचय करून देणारा आदर्श ग्रंथ