ए. एम. टी. जॅेक्सन यांचे 'कोकणची लोकसंस्कृती' हे वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे. कोकण, कर्नाटक, गोवा तसेच गुजरात या भागातील लोकजीवनाचा, लोकमानाचा आणि लोकसंकल्पनांचा अभ्यास जॅेक्सन यांनी केला.त्यांच्या ह्या संबंधीच्या क्षेत्रीय अभ्यासातून काही ग्रंथ निर्माण झाले.प्रस्तुत पुस्तकातून कोकणचे तत्कालीन सामाजचित्र उभे राहिले आहे. लोकमनात रुजलेल्या धार्मिक भावना, आचार-विचार, समाजाची जडण-घडण, रूढी, परंपरा यांचा जॅेक्सन यांनी बारकइने शोध घेतला आहे.
पुस्तकातील अकरा प्रकरणांतून कोकणातील निसर्गशक्ती, दैवशक्ती, श्रद्धा, पूर्वज व संतांची पूजा, प्राणीपूजा, वृक्षपूजा, भुताटकी, जादूटोणा,रोग, उपचार अशा समाजमनात रुजलेल्या अनेक गोष्टींचीनिरीक्षणे मांडली आहेत. शेवटी जोडलेल्या शब्दसूचीमुळे अभ्यासकांची व जाणकार वाचकांची सोय झाली आहे.
समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि धर्मतत्वंचा तौलानिक अभ्यास करणारे अभ्यासक ह्या पुस्तकाचे नक्की स्वागत करतील, यात शंका नाही.