आजीच्या मते,
“अठरा डब्यांच्या ट्रेन इकडून तिकडे जात असतात ना,
तशा मैत्रेयीच्या मेंदूतून प्रत्येक बाबतीत
अठराशे प्रश्नांच्या ट्रेन फिरत असतात !”
मैत्रेयीचे आजचे प्रश्न होते केसांबद्दलचे !
मैत्रेयीचे केस छोटे होते, पण तिला
लांब वेणी घालायला आवडत असे.
आईचे केस तर कापलेले होते.
आजी तिच्या केसांचा आंबाडा घाले आणि
तिच्याकडे तिच्या आजीने दिलेलं
आंबाड्यावर लावायचं सोन्याचं फूलही होतं.
आजोबांचे केस गायब होऊन टक्कल पडलेलं होतं.
मैत्रेयीच्या घरी एके दिवशी बाबाची मैत्रीण सुकेशा आली.
तिचे केस पायांच्या घोट्यापर्यंत लांब होते.
तिची वेणी घालून देताना आजीला चांगलीच अद्दल घडली!