"कथापौर्णिमा" हा विविधांगी मानवी नातेसंबंधांचे अनुबंध उलगडणाऱ्या पंधरा कथांचा संग्रह आहे. 'होते कुरूपं बेडे या कथेतून सौंदर्याच्या भ्रामक कल्पनांवर मात करणारी विदुला भेटते, वास्तव आपुष्य आणि मनोरंजन विश्व यातील दरी "होम मिनिस्टर' नंतर या कथेतून सीमाच्या नजरेतून अधोरेखित होते, आयुष्याला बिटलेल्या शारदेची व्यक्तिरेखा "मरणाने केली सुटका'मधून प्रखरपणे उभी राहते, तर आई-मुलीचे हळूवार बंध "नाळ" या कथेतून उलगडतात. 'तुझ्या नसानसांत मी", "निस्सीम", "हृदयी वसंत फुलताना आणि मनाचिये गुंती' कथांमध्ये प्रेमाच्या अनेकरंगी मनमोहक कंगोऱ्यांचे दर्शन होते. "अभंग "बाणी आणि "स्वीकार" या कथांतून लहान मुलांचे भावविश्व उलगडते, तर "अनुदिनी अनुतापे' आणि 'फॅमिलीवाला' या कथा पुरुषांची संवेदनशील बाजू मांडतात. "वटवृक्ष", "पराभव" आणि "व्हॉट्सप आई" या कथा ज्येष्ठ नागरिकांच्या अंतरंगात डोकावतात.प्रत्येक माणूस अनेक गुंतागुंतीच्या, तरी हव्याहव्याशा नात्यांमध्ये गुंतलेला असतो. त्याच नात्यांना विविध परिस्थितीच्या कोंदणात बद्ध करून, त्यातून निर्माण झालेल्या बंधांचे दर्शन “कथापौर्णिमा'मध्ये समर्थपणे होते. वा कथा चित्रदर्शी आहेत. प्रत्येक वयोगटाच्या वाचकाला स्वतःचे प्रतिबिंब या कथांमध्ये दिसेल.