नाओ नावाची जपानी मुलगी डायरी लिहिते...ती डायरी एका बेटावर राहणाऱ्या लेखिकेला, रुथला सापडते...नाओ आणि रुथच्या प्रथमपुरुषी निवेदनातून कादंबरी पुढे सरकत राहते...नाओचे वडील सिलिकॉन व्हॅलीमधल्या एका मोठ्या कंपनीत नोकरी करत असतात...ते नावाजलेले कॉम्प्यूटर प्रोग्रामर असतात...पण त्यांची नोकरी जाते आणि नाओ तिच्या आईविडिलांसह टोकियोला येते...शाळेतल्या मुलांकडून नाओवर होणारं रॅगिंग, तिच्या वडिलांचं नैराश्य, त्यांनी आत्महत्येचे केलेले प्रयत्न...एवूÂणच, झाकोळलेलं नाओचं जीवन...तिची बौद्ध धर्माचं अनुसरण करणारी पणजी जिकोचा तिच्यावर प्रभाव...एका क्षणी वडिलांच्या नोकरी जाण्याचं आणि त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नांमागचं कारण नाओला समजणं आणि त्याच वेळी जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा दृष्टिकोन गवसणं...नाओची डायरी वाचून तिला भेटण्याची उत्सुकता रुथच्या मनात दाटून येणं... क्वान्टम फिजिक्स थिअरी, व्यावहारिक जीवन, अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारी, बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली विलक्षण कादंबरी