'वारसाहक्काने मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती असो किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता असो, आपल्या निधनानंतर तिची नीट जपणूक व्हावी, असे वाटणा-या सर्वांनी वेळेवरच व्यवस्थापत्र करून ठेवले पाहिजे. वृद्धपकाळी, मृत्यूची चाहूल लागल्यावर घाईगडबडीत करावयाची ती गोष्ट नाही. समजून-उमजून योग्य वेळी आपल्या संपत्तीचे इच्छेनुरूप वाटप करून ठेवणे हे प्रत्येक प्रौढ, सधन माणसाचे कर्तव्यच आहे. ते कर्तव्य कसे पार पाडावे, याचा सोदाहरण सल्ला देणारे, एका कायदेविषयक तज्ज्ञाने लिहिलेले सोपे, सुबोध पुस्तक.