उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Kameroo By Shri. Na. Pendse

Description

मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून श्री. ना. पेंडसे परिचित आहेत. कोकणचा निसर्गसमृद्ध प्रदेश त्यांनी आपल्या लेखणीतून समर्थपणे उभा केला आहे. कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र या विविध वाङ्मयप्रकारात त्यांनी चौफेर आणि सशक्त लेखन केले आहे. कोकणातील माणसं, वेगवेगळी ठिकाणं आणि संपन्न समुद्रकिनारा याचं सर्जन म्हणजे पेंडसे यांचं एकूण लेखन आहे.घटना, प्रसंग, निवेदन, संवाद, सहज भाषाशैलीत जीवनानुभव त्यांच्या लेखनात सहजपणे येऊन जातो. रंजनात्मकतेच्या पलीकडे जाऊन स्वत:ला जाणवलेली अनुभवसृष्टी ते आपल्या लेखनातून उभी करतात. जीवनातील नाट्य रेखाटताना निवेदनात तटस्थ तरीही जीवनवेधी अशा चैतन्ययुक्त, जिवंत निवेदनातून जीवनाचे नाट्यमय दर्शन घडवतात.त्यांच्या ‘कामेरू’ या कादंबरीचा विषय कामभावना असला तरी वैविध्यपूर्ण विषय यात येतात. ग्रामजीवनापासून सुरू होणारी ही कथा शहरी जीवनात स्थिरावते. कामवासनांचे, सुखदु:खांचे चित्रण विलक्षणतेने येते. आदिम कामेच्छांचे चित्रण अस्वस्थ करते. अनीतिमानतेवरही प्रकाशझोत टाकते. एकूणच कामभावना आणि त्याभोवती येणारे आदी विषय पेंडसे सूक्ष्मपणे ‘कामेरू’मधून रेखाटतात.
नियमित किंमत
Rs. 270.00
नियमित किंमत
Rs. 300.00
विक्री किंमत
Rs. 270.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Kameroo By Shri. Na. Pendse
Kameroo By Shri. Na. Pendse

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल