आश्लेषा महाजन
ही एक कवी मनाची
कवयित्री आहे.
‘कळ्यांचे ऋतू’मध्ये
तिने वयात येणार्या मुलींचे
मन पाकळी पाकळीने
उमलवले आहे.
या बीजकथा आहेत.
एखादी भावपूर्ण, नाट्यपूर्ण घटना
लेखिका पात्रांच्या मनात शिरून
आतल्या आवाजात सांगते
तेव्हा त्यातून नकळत वाचकाची
जीवनजाणीव समृद्ध होते.
कुमारिकांनीच नव्हे
त्यांच्या पालकांनी,
शिक्षिकांनी,
आपण सर्वांनीच
या बीजकथांच्या डोळ्यांनी
स्वत:कडे पाहिले पाहिजे;
मग ‘प्रथम वयसा काळीं |
लावण्याची नव्हाळी |’ ज्या कळ्यांना लाभते
त्यांचे आतले आवाज आपण
डोळ्यांनीही ऐकू शकू!