विस्मय, अद्भुतता, अनाकलनीय गूढ या गोष्टींचे मानवी मनाला नेहमीच आकर्षण असते. विज्ञान यातील ब-याच गोष्टींवर सत्याचा प्रकाश टाकते. पण जसजसे विज्ञान पुढे जाते, तसतसे ते स्वत:बरोबरही काही प्रश्नही निर्माण करते. शास्त्रज्ञ त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतत जातात. आणि आपण सगळेच विज्ञान आणि विज्ञानाने निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाच्या भोव-यात रमून जातो. आणि पुन्हा पुन्हा अनुत्तरित प्रश्नांच्या आणि कल्पनांच्या वलयात गुंगून जातो. ह्या कथा अशाच सहज सुचलेल्या वैज्ञानिक कल्पनांमधून साकारल्या आहेत. ह्या कथांमधील कल्पना खNया का खोट्या यांचे मोजमाप न करता, केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात. त्यामधून वैज्ञानिक सिद्धांत इ. शोधण्याच्या भानगडीत पडू नये. कारण ह्या सर्व कथांमधील पात्रे, प्रसंग, विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. कथा काय विंÂवा कविता काय शेवटी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि म्हणून असे म्हणतात ना... ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ त्यामुळे कुणी सांगावे, की आज ज्या निव्वळ कल्पना वाटत आहेत त्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे, भविष्यकाळी प्रत्यक्षातही येतील कदाचित.