सखी अन् मित्राचं नातंच मुळी अनोखं. स्त्री-पुरूष मैत्रीच्या या अनवट नात्याचे अनेक अन्वयार्थ अनेक साहित्यकृतींना चिरंतन आव्हान देत राहिले आहेत. राखी आणि मंगळसूत्राच्या मधल्या या नात्याचे अलवार पदर उलगडतानाच या नात्याला असणारे प्रेम आणि दहशत यांचे सूक्ष्म अस्तर तपासणारी ही कहाणी. ही कहाणी एकीकडे तरल आणि भावनोत्कट आहे; पण त्याच वेळी विचारगर्भही आहे. ‘नचिकेताचे उपाख्यान’ आणि ‘श्रावणसोहळा’ या अनेक पुरस्कारप्राप्त कादंबर्यांचे लेखक संजय भास्कर जोशी यांचे कथाक्षेत्रातले हे दमदार पाऊल म्हणावे लागेल.
- रेखा इनामदार साने