शाहिरी प्रकाराच्या अभ्यासात कलगी-तुरा ह्या परंपरेला वैशिष्टपूर्ण व महत्त्वाचे स्थान आहे. लोककलांच्या माध्यमातून हे वाङ्मय लोकाभिमुख झाले आहे. कलगी-तुरा म्हणजे काय हे अभ्यासतानाच ह्या परंपरेचा विकास त्यातील अध्यात्म आणि लोकतत्त्व समजून घेऊन त्याची शास्त्रीय चर्चा प्रस्तुत पुस्तकात केली आहे. ह्या वाङ्मय प्रकारातील प्रतिकांचा, रूपकांचा, मिथकांचा ऊहापोह करतानाच त्याविषयीचे समज-अपसमजही येथे स्पष्ट केले आहेत. एकूणच लोकसाहित्याच्या वाचकांना व अभ्यासकांना ही चर्चा उपयुक्त ठरेल हेच ह्या पुस्तकाचे वैशिष्टय आहे.