उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Kabutarkhana by Mahesh Karandikar

Description

‘कबुतरखाना’ हा महेश कराडकर यांच्या सकस कवितांचा पहिलाच संग्रह आहे. या संग्रहाचे शीर्षक जात, धर्म, लिंगभाव आणि तथाकथित सामाजिक जाणीव या व्यवस्थेच्या नजरकैदेत कप्पेबंद झाल्याचे सूचन करते. ही कविता मैत्री, स्नेहभाव, सग्यासोयर्‍यांचे सुखदु:ख अधोरेखित करताना कुठेही हळवी अथवा भावविवश होत नाही. उलट या प्रकारच्या सर्वच मुल्यभावांना भिडून रोकडे प्रश्‍न उपस्थित करते. खोटेपणा किती दाखवावा, किती मिरवावा याची काही सीमा राहिलेली नाही. उलट अशाच प्रवृतींना बेरकीपणाने उचलून धरले जाते आहे, याची जोरकस खतं कवीला आहे. म्हणूनच कवी ‘तुकोबाच्या धोतराला ग्लोबल चेन’ लावून देशीपणा मिरवणार्‍या दांभिकांची हजेरी घेतो, पंरतु यातूनच कवीला वास्तविकता तपासून पाहण्याची निकड वाटते. सगळीच मूल्ये उलटीसुलटी गुंडाळून खोटा मोठेपणा मिरवणार्‍या संधीसाधूंच्या गर्दीत कवीला अजिबात रस नाही. या मध्येच कवीची स्वत:ची स्वतंत्र, स्वच्छंद आणि ठाम भूमिका असल्याचे कविता वाचताना आढळून येईल. ‘स्वीस बँकवाले चित्रगुप्ताच्या बापालाही बँक अकौंट दाखवणार नाहीत’ हे नागडे सत्य कविता वाचताना स्वीकारावे लागते. आर्थिक उदारीकरण, भ्रष्टाचार,फसवणूक, हिंसा याने ग्रस्त झालेल्या समाजाची लाज झाकायला गांधीजींच्या ‘माकडांचे‘ सहा हातही पुरेसे पडणार नाहीत, असे कवी ठामपणे मांडतो. एका अस्वस्थ मनाने उद्याच्या स्वस्थ, सुरक्षित, निर्भय अवकाशात झेप घेण्यासाठी खुला केलेला हा ‘कबुतरखाना’ खरोखरीच चिंतनीय आहे. – प्रा. डॉ. मोहन पाटील 
नियमित किंमत
Rs. 90.00
नियमित किंमत
Rs. 100.00
विक्री किंमत
Rs. 90.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Kabutarkhana by Mahesh Karandikar
Kabutarkhana by Mahesh Karandikar

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल