बुध्दिमत्तेच्या जोरावर माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला, पण भूतलावर आनंदाने जगण्यासाठी त्याला बुध्दिमत्तेस भावनिक संतुलनाची जोड द्यावी लागते. आयुष्यात लौकिकार्थाने यथस्वी होण्यासाठी कदाचित केवळ बुध्दिमत्ता उपयोगाला येत असेलही, परंतु सुखी होण्यासाठी मात्र भावनिक बुध्दिमत्ताही जोपासावी लागते; स्वत:ची त्याचप्रमाणे आपल्या मुलांचीही. त्याविषयी महत्वाचे काही.