धर्माची झूल पांघरून तीन डोंगरांच्या मिठीत वर्षानुवर्ष पहुडलेल्या अन् आधुनिकतेचं वारं अंगावरही न आल्यानं देठापासून तुटलेल्या गावाची ही कहाणी.गावाची राखण करणारं दत्तमंदिर, महानुभाव श्रीधरबाबा, बनूबाई, आंधळा मुरली अन् गूढ जाई सगळेच ‘जरंगात’ आदिमतेचा वारसा सांभाळीत गुंता वाढवत जातात.