उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी
Jani Janardan By Dhiraj Vatekar
Description
Description
‘निरंतर कर्म करा, कर्मावरील आसक्तीचा त्याग करा’ या मूलभूत मानवी तत्त्वज्ञानाचे रहस्य सांगू पाहाणाऱ्या, सतत कार्यरत राहात आपले जीवन कृतार्थ करणाऱ्या, ‘हाफकिन’ मुंबई यांनी शोधलेल्या विंचूदंशावरील लसीचे ‘प्रवर्तक’ आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय उर्फ तात्यासाहेब नातू या दैवी अंश लाभलेल्या डॉक्टरांचे हे जीवनचरित्र आहे. एखादा ‘आमदार’ हा ‘देवमाणूस’ असू शकतो, हे सांगून कदाचित आजच्या पिढीला खरं वाटणार नाही. पण हे सत्य सांगणारे हे चरित्र आहे. चरित्रनायकांना आपल्यातून जाऊन तीन दशकांचा कालावधी लोटला आहे. ‘आरोग्य सर्वांसाठी’ या उक्तीला खऱ्या अर्थाने जागलेल्या त्यांच्यासारख्या लोकोत्तर पुरुषांच्या लोकसेवेचे मूल्यमापन करताना त्यांच्या सेवेचे समाजहिताशी नेमके नाते कोणते आहे? याचा विचार करावा लागतो. व्यक्तीच्या पश्चात जसा काळ पुढे सरकत राहातो तसे व्यक्तीच्या कर्तृत्वाचे, समाजहितैषी विचारधारांचे संदर्भ अधिक स्पष्ट होत जातात. अनेक घटकांना अंतर्यामी सामावून घेत, चंदनाप्रमाणे झिजत कापराप्रमाणे जळणारे काम चरित्रनायकांनी आनंदी वृत्ती ठेवून स्वीकारले. त्यांची ही जीवननिष्ठा आणि लोकसंग्राहक वृत्ती आपल्याला चरित्रात भेटेल. माणसांच्या जीवित कार्याचं यश हे केवळ विकासकामे आणि त्याच्या यशापयशावरून मांडता येणार नाही. कालातीत व्यक्तिमत्त्वे आणि त्यांचे विचार लोकप्रियतेच्या निकषावर तपासले जातात. त्यात या चरित्रग्रंथाच्या नायकांची महनीयता आणि विश्वासार्हता खूप असल्याचे स्पष्ट होते. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील कोकणी जनमानस आणि राजकारण अभ्यासताना, ‘चरित्रनायकांनी केलेले कार्य, वेळोवेळी मांडलेल्या भूमिका चटकन समोर येत नाहीत. तरीही समाजात त्यांच्यासारखी माणसं असायला हवीत. समाजाला त्यांची गरज आहे’, हे सांगण्यासाठी हे चरित्र आहे.
- नियमित किंमत
- Rs. 650.00
- नियमित किंमत
-
Rs. 1,299.00 - विक्री किंमत
- Rs. 650.00
- युनिट किंमत
- / प्रति
-50%
शेअर करा
हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
Jani Janardan By Dhiraj Vatekar