उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडणं किती अवघड असतं? एक रुपयाचं नाणं 10 कि.मी. अंतरावरून बंदुकीनं अचूक टिपण्याएवढं!' हे साधलं भारतीय शास्त्रज्ञांनी. ही कथा त्यांचीच! त्यांनी पाहिलेल्या अफाट स्वप्नांची. त्यांच्या अथक प्रयत्नांची, परिश्रमांची. त्यांच्या अपयशाची, अपयशातूनही टिकलेल्या जिद्दीची! आणि सामान्य भारतीयांबाबत त्यांना असलेल्या कळकळीची-