इरावती कर्वे यांचा मराठी वाङ्मयप्रवाहावर कधीही पुसला जाणार नाही असा ठसा आहे. त्यांनी ‘ललित-निबंध’ हा नवा लेखनप्रकार हाताळून नावारूपास आणला. ‘परिपूर्ती’ हा त्यांचा ललित निबंधाचा संग्रह त्यांच्या याच ऐतिहासिक कामगिरीची स्मरण-खूण आहे.
‘युगान्त’ लिहून त्यांची महाभारताच्या वास्तव आकलनाची एक नवदिशा सूचित केली आणि ते महाकाव्य समान्यांच्या आकलन-कक्षेत आणले. मूलत: मानवशास्त्र व समाजशास्त्र या विद्याशाखांच्या अभ्यासक असणार्या इरावतीबाईंनी मराठी वाङ्मयास थोरले योगदान दिलेले आहे.
प्रस्तुत ग्रंथात त्यांच्या समग्र लेखनकर्तृत्वाचा समीक्षात्मक आलेख काढलेला आहे.
इरावतीबाईंच्या कार्यकर्तृत्वाची नीटस ओळख करून घेण्यासाठी हा ग्रंथ अभ्यासकांना उपकारक ठरेल.