मुघल राजा अकबराच्या दरबारी असणाऱ्या नवरत्नांपैकी एक म्हणजे बिरबल, बिरबल अतिशय चतुर आणि मुत्सद्दी होता. अकबर अनेक अवघड प्रश्न विचारून बिरबलाच्या चातुर्याची आणि हुशारीची परीक्षा घ्यायचा आणि बिरबल अचूक उत्तर देऊन अकबराला निरुत्तर करायचा. बिरबलाने अनेक लष्करी मोहिमांचे नेतृत्व केले, तसेच राज्यकर्त्यांशी मुत्सद्दीपणे व्यवहारही केला. तो योग्य न्यायनिवाडा करत असे. हुशार बिरबलाच्या या कथा फक्त मनोरंजन करत नाहीत, तर मनात आदर्श मूल्यांची पेरणीही करतात. त्याच या अकबर-बिरबलाच्या कथा !