उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Hridayah Swastah By Arun Mande

Description

हृदयाची योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम त्याचे कार्य कसं चालतं याची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच हृदयाला पोषक अशा अन्नघटकांचं नेमकं कार्य कोणतं, हृदयरोगाची कारणं व लक्षणं कोणती हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.हृदयाचे संरक्षण करण्यासाठी अन्न हे आघाडीच्या सैनिकासारखे काम करते. आहारावर लक्ष ठेवून तुम्ही हृदयरोग किंवा ‘हार्ट-अ‍ॅटॅक’ची शक्यता खूपच कमी करू शकता.आहाराची योग्य निवड ही फक्त हृदयरोग्यांचीच गरज नसून सर्वांचीच आहे. पण हृदयरोग्यांच्या दृष्टीने आहाराचं महत्त्व जास्त आहे.सुदैवाने भारतीय पाकशास्त्रामध्ये शाकाहारी व मांसाहारी व्यंजनांचे प्रकार व वैविध्य खूप आहे. रायते, चटणी, सॉस, पोळी, भाकरी, पुलाव, खिचडी, सुकामेवा, कमी गोड असलेले पदार्थ, पौष्टिक नाष्टा यांचेही अनेक प्रकार आहेत. तेला-तुपाचा वापर कमी करूनही चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ बनविता येतात.या पुस्तकात हृदयाचे कार्य, त्याचे आरोग्य व त्यासाठी योग्य आहार याविषयी संपूर्ण माहिती देऊन लो-कॅलरी, लो-कोलेस्टेरॉल, लो-फॅट असलेल्या, करायला सोप्या परंतु हृदयरोग्यांना अतिशय पोषक तरीही चविष्ट अशा १२५ पाककृतीही दिल्या आहेत.
नियमित किंमत
Rs. 175.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 175.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Hridayah Swastah by Arun Mande
Hridayah Swastah By Arun Mande

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल