जगन्मान्य शिक्षिका लुईस एल. हे यांनी लाखो लोकांना स्वास्थ्य मिळवून दिले आहे आणि प्रभावित केले आहे.वीस वर्षांपूर्वी त्यांना स्वतःला कॅन्सर झाला होता आणि या पुस्तकात त्यांनीच सांगितलेल्या उपायांनी तो त्यांनी स्वतःच बरा केला.आपण जो विचार करतो आणि जे शब्द रोज वापरतो, त्यांनुसार आपले आयुष्य घडत असते, आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होत असतो आणि आपल्या अनुभवांना आकार येत असतो. हे विचार आणि शब्द यांमध्ये बदल घडवून आणले, तर आपले संपूर्ण आयुष्यच बदलून जाते.आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि आपण वापरत असलेली भाषा यांचा आपल्या आरोग्यावर कसा विपरीत परीणाम होतो आणि रोग कसे निर्माण होतात, हे लुईस एल. हे यांनी समजावून सांगितलं आहे.सहज आणि सोप्या पद्धती वापरून तुमच्या रोगाचं मूळ कारण असलेल्या विचारांची साखळी तुम्हीच आश्चर्यकारकपणे शोधून काढू शकता आणि स्वतःबद्दल बरेच काही माहीत करून घेऊ शकता. तुमच्या रोगाचं निरीक्षण करा, त्याला आव्हान द्या आणि सकारात्मक विचारांची साखळी शोधून काढा… आणि रोगाचा नायनाट करा. निरोगी होण्यासाठी रोगमुक्तीचा मार्ग कसा अनुसरायचा, हे या पुस्तकातून तुम्हाला वाचायला मिळेल.लुईस एल. हे जगप्रसिद्ध मेटाफिजिकल प्राध्यापक आणि गुरू आहेत. त्यांनी तन- मनाला स्वास्थ्य प्रदान करण्यासाठी डझनभर पुस्तके लिहिली आहेत. त्यांची पुस्तके जगातील अनेक भाषेत भाषांतरित झाली आहेत.