विज्ञान हा खरंतर प्रयोगाद्वारे किंवा प्रात्यक्षिकांद्वारे शिकविण्याचा आणि शिकण्याचा विषय आहे. विज्ञानातले वेगवेगळे सिद्धांत, नियम, तत्त्वे या गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगायच्या असतील तर त्यासाठी प्रयोग करणे किंवा प्रात्यक्षिक दाखविणे आवश्यक असते. कारण प्रयोगांमधून आपल्याला निसर्गातील अनेक संकल्पना उलगडतात. चिकटणारी बोटं, तुम्ही हातामधूनही पाहू शकता!, नाहीसं होणारं तिकीट, प्रत्यक्षात नसलेले रंग, नृत्य करणारं नाणं, चिकटणारे ग्लास, कागदाचा तुकडा खाली पाडून दाखवा, चाळणीतून पाणी न्या, उकडलेलं अंड शोधा बरं! याविषयी काही माहितीये तुम्हाला? नाही? मग हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. एरवी क्लिष्ट वाटणारे प्रयोग रंजक स्वरूपात दिल्यामुळे विद्यार्थ्यांना ते समजून घेणे सोपे होईल. केवळ विद्यार्थीच नव्हे तर विज्ञानाची आवड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे प्रयोग सहज करता येण्याजोगे आहेत. साध्या साध्या वस्तूंच्या माध्यमातून घरबसल्या ‘बौद्धिक विकासाचे प्रयोग’करा आणि तुमच्या हुशारीने इतरांना चकित करा.