मुलाला एखादा विषय आवडणे, न आवडणे हे तो विषय शिकवण्याच्या पध्दतीवर अवलंबून असते. शिकवण्याच्या गंभीर, रूक्ष पध्दतीने मुले त्या विषयाला कंटाळतात. उलट तोच विषय हसत-खेळत, गमतीदार पध्दतीने मांडला, तर मुले त्यात रंगून जातात. गणित हा शालेय अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा विषय. पण बहुतेक मुलांना हा विषय म्हणजे फक्त कंटाळवाणी किचकट आकडेमोड वाटते. हीच कंटाळवाणी ‘किचकट आकडेमोड’वेगळ्या रूपात, वेगळ्या वेशात मुलांपुढे आली तर ? आपण एक गमतीदार नवीन खेळच खेळत आहोत, असे म्हणता म्हणता गणितातील काही महत्त्वाची सूत्रे त्यांच्या मनात ठसलेली असतात. दहा ते अकरा वर्षे वयोगटातील इयत्ता पाचवी-सहावीच्या मुलांसाठी भागाकार, गुणाकारास लसावि आणि मसावि या संकल्पनांची अशीच हसतखेळत ओळख करून देणारे हे पुस्तक मुलांप्रमाणेच हा विषय शिकवणाऱ्या गणित शिक्षकांनाही उपयोगी पडेल.