'व्यक्तिगत आरोग्य आणि पर्यावरण ह्यांच्या असंख्य समस्यांचा सामना करावा लागत असूनही बहुसंख्य जण विकासाच्या मुख्य प्रवाहाबरोबरच वाहत राहतात. पण हा मुख्य प्रवाह हिमतीनं नाकारून त्यातून बाहेर पडणारे, वेगळ्या वाटा चोखाळणारे असेही अनेक जण आहेत. त्यांनी आपल्या जीवनाचा वेग, कार्यक्षेत्र आणि गुंतागुंत कमी करण्याची प्रयत्न केला आहे. म्हटलं तर ते चारचौघांसारखंच सामान्य जीवन जगत आहेत; पण त्या सामान्य- पणातच एक असामान्यत्व दडलेलं आहे. अशांपैकीच काहींचा परिचय करून देणारा हा आगळा-वेगळा ग्रंथ '