• वीजमंडळ, रेशनकार्ड, गॅस • बँका, विमासेवा • टेलिफोन, मोबाईल • हाउसिंग सोसायटी विषयक नियम • विविध शासकीय सेवा • माहितीचा अधिकार • ग्राहक संरक्षण कायदा • केंद्र अन् राज्य सरकारची तक्रार-निवारण यंत्रणा रोजच्या आयुष्यातील अशा कितीतरी बाबींमध्ये आपण सारेजण ग्राहकाच्याच भूमिकेत वावरतो. गुणवत्तापूर्ण वस्तू अन् सेवा मिळण्याचा अधिकार ग्राहक म्हणून साऱ्यांनाच असतो. मात्र बरेचदा आपल्याला आपल्या या अधिकाराची जाणीव नसते. दैनंदिन जीवनातल्या कितीतरी गरजांबद्दलच्या अशा आपल्या अधिकारांची उपयुक्त माहिती देणारे - हरघडी येणाऱ्या अडचणींवर खात्रीशीर उपाय सांगणारे - ग्राहक राजा, सजग हो !