डॉ.गंगाधर मोरजे यांच्या ‘गोमंतकातील ख्रिस्ती-मराठी वाङ्मय : शोध आणि बोध’ या ऐतिहासिकदृष्ट्या संशोधनसमृद्ध पुस्तकाने ख्रिस्ती-मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली आहे.केवळ महाराष्ट्र व गोवाच नव्हे तर प्रादेशिकतेच्या मर्यादा ओलांडून व कोणत्याही अभिनवेशाला बळी न पडता ख्रिस्ती-मराठी वाङ्मय-संशोधनाच्या स्थितीगतीचा, हेतूकारणांचा व परिणामांचा आवश्यक व मूलगामी धांडोळा त्यांनी घेतला आहे.
संशोधन क्षेत्रात नव्याने वाटचाल करू पाहणार्या नवोदित संशोधकांना तसेच या अभ्यासक्षेत्राविषयी जे अनभिज्ञ असतील त्यांना या क्षेत्रातील कष्टप्रद, निरासक्त वृत्ती, आणि ज्ञानसातत्य यांचे दर्शन निरपवादपणे घडेल, यांत संदेह नाही.