गोजी : ठाण्याच्या शाळेत नववीत शिकणारी मुलगी. तिला पुस्तकातून भेटलेली अजब मैत्रीण - मुग्धा. ‘करोना'च्या आजारावर प्रभावी लस शोधणारे शास्त्रज्ञ - दुष्यंत सावरकर. त्यांचे शत्रुराष्ट्राने अपहरण केले. गोजी अन् मुग्धा या जोडगोळीने सावरकरांचा शोध घेण्याचा निश्चय केला. आपल्या कामात दोघीजणी यशस्वी झाल्या का? कोण होती मुग्धा? कुठे होते तिचे जग? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, किशोरांना आपल्यासोबत ओढून नेणारी रहस्यकादंबरी.