उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Goa Sanskrutibandha by Vinayak Khedekar

Description

गोव्याच्या लोकसंस्कृतीचे अंतरंग स्पष्ट करणारे लेखक म्हणून श्री. विनायक खेडेकर सुपरिचित आहेत. गोव्याच्या लोककला, लोकभाषा यांचेही ते अभ्यासक आहेत. पणजी येथील गोवा कला अकादमीचे सचिव म्हणूनही ते काही वर्षे कार्यरत होते. गोव्याच्या मातीशी व संस्कृतीशी एकरूप झालेले त्यांचे अनुबंध ‘गोवा संस्कृतिबंध’ ह्या पुस्तकातून स्पष्ट होत आहेत. गोव्याला स्वत:चे वेगळे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. हे वेगळेपण तेथील लोकसंस्कृती व लोकजीवन यांतून स्पष्ट होते. लोकसंस्कृतीमधील श्रद्धा, पूजा, दैवते, उपासना, विविध वर्गाच्या चालीरीती, प्रथा-परंपरा, श्रद्धा व संकेत या व अशा अनेक गोष्टींतून गोव्याचे समाजजीवन उभे राहते. श्री. खेडेकर यांच्या ह्या पुस्तकांतून हे सर्व स्पष्ट होत आहे. प्रस्तुत पुस्तकात श्री. विनायक खेडेकर यांचे लोकसंस्कृतीविषयक लेख गोव्याची समकालीन संस्कृती समजून घेण्यास मार्गदर्शक ठरतात. भारतीय विद्याशाखांच्या व मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांनाही हे पुस्तक उपुक्त ठरेल, यात शंका नाही.    
नियमित किंमत
Rs. 153.00
नियमित किंमत
Rs. 170.00
विक्री किंमत
Rs. 153.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Goa Sanskrutibandha by Vinayak Khedekar
Goa Sanskrutibandha by Vinayak Khedekar

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल