डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.
का नसावा ?त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;
त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :
त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले.
"मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले
-
गावसासू
एनआरआय यांचा प्रश्न आज ऐरणीवर आला आहे :
१९३० सालीच त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी "गावसासू - परागंदा भारतीयांचे एक सामाजिक दृश्य " या कादंबरीत केले आहे.
केतकरांना विदेशवस्तव्याचा अनुभव होता आणि त्यांच्यापाशी एक व्यासंगनिष्ठ समाजशास्त्रीय दृष्टी होती:
मग त्यांची कादंबरी गतकाळातच आजच्या आपल्या सामाजिक वास्तवाचा वेध घेऊ शकली यात आश्चर्य कसले ?
मात्र गावसासू मिसेस दास आणि तिच्या मुली यांच्याभोवतीच्या स्वैर जीवनाचे चित्रण कितपत वास्तव आहे, या शंकेने वाचक अस्वस्थ होतो खरा !
- डॉ. द. भि. कुलकर्णी