{"product_id":"gavandhal-गावंढळ-by-dr-tanajirao-chorge","title":"Gavandhal (गावंढळ) by  Dr. Tanajirao Chorge","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"UTF-8\"\u003e\u003cspan\u003e\"आपली कुवत ओळखावी व खर्च करावा. फॅशनेबल, मॉडर्न होणं, पार्त्या करणं, विचित्र कपडे घालणं, लग्नाअगोदर 'प्रिवेडिंग' करणे, 'लिव्ह इन रिलेशन' हे सर्व कुटुंबव्यवस्था संपवण्याचे रस्ते आहेत, आणि हे आम्ही चोखाळले होते. त्यातच आम्ही फसलो आहोत. या रस्त्याने जाणारा प्रत्येकजण माणसातून व माणुसकीतून उठतो. तो वेगळा पडतो. स्वत:च्याच जगात रमतो व एकवेळ तो एकाकी पडतो. मलाच काय आम्हा सगळ्यांना कळलेलं आहे की, या सर्व गोष्टी संस्कार व संस्कृतीबरोबर नातीगोती व संस्कार, संस्कृती मातीत मिसळवणारे आहेत आणि हे सर्व करूनही शेवटी माणूस मातीतच जाणार. ज्या मातीतून निर्माण होणारे व माणसाला जगवणारे धान्य या मातीतून मिळते ते शेतकरी करतात. ते या भागात राहतात. ते 'गावंढळ' आहेत म्हणून आम्ही आईसाहेबांना व इतरांना हिणवलं. आमच्या परीनं कमी लेखलं. चूक झाली आमची. आम्हाला माफ करा. आजपासून या मातीत आमचा शेवटचा श्वास जावा व शरीर याच मातीत मिसळावं, एवढीच इच्छा घेऊन आम्ही इथे आलोय. आमचा स्वीकार करावा. आम्ही या वाड्यात मोलकरणी म्हणून राहू.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya LLP","offers":[{"title":"Default Title","offer_id":54625982579006,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/files\/WhatsAppImage2026-10-15at10.21.39AM.jpg?v=1792153184","url":"https:\/\/rasiksahitya.com\/mr\/products\/gavandhal-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a2%e0%a4%b3-by-dr-tanajirao-chorge","provider":"Rasik Sahitya LLP","version":"1.0","type":"link"}