गोष्ट जेव्हा स्फुरते, तेव्हा ती आपला आकार घेऊनच येते. पण हे नेहमीच होते, असे नाही. काही वेळा कथेचे अगदी लहान बीज मनात येऊन पडते – पिंपळाच्या बीजासारखे. अशी बीजे नेहमीच पडत असतात; पण त्यातले गवताचे कोणते आणि पिंपळाचे कोणते, हे मात्र कळते. नेमके कळत नाही; पण पुढे जो विस्तीर्ण अश्वत्थ वृक्ष होणार असतो, त्याच्या पानांची नुसती गंभीर सळसळच ऐकू येते. ...अशीच पानांची सळसळ असलेला वृक्ष! म्हणजे ‘गावाकडच्या गोष्टी’
I AM INSPIRED WITH A STORY AND THIS STORY HAS ITS DEFINITE SHAPE AS IT ACQUIRES MY THOUGHTS. BUT I CANNOT SAY THAT THIS IS WHAT HAPPENS ALWAYS. AT TIMES, THERE JUST A TINY SEEDLING THAT DROPS ONTO THE SOFT CUSHIONS OF MY MIND, AWAITING FAVOURABLE CONDITIONS FOR GERMINATION, JUST LIKE THE PEEPUL SEED. IT IS ALSO TRUE THAT EVERY NOW AND THEN MANY SUCH SEEDS DROP INTO MY MIND. IT IS NOT POSSIBLE TO DIFFERENTIATE THE PEEPUL SEED FROM THAT OF GRASS. YET, I CAN SURELY HEAR THE WIND PASSING THROUGH THE DENSE FOLIAGE OF THE PEEPUL. THESE STORIES RESEMBLE THE WIND PASSING THROUGH IT.