महाभारतात युवानाश्वाचा उल्लेख आहे, जो निपुत्रिक आहे आणि त्याच्या पत्नीसाठी, ती गर्भवती व्हावी म्हणून तयार केलेले जादुई औषध अपघाताने तो स्वतःच प्राशन करतो आणि एका पुत्राला जन्म देतो. देवदत्त पट्टनायक यांची ‘गर्भवान राजा’ ही पहिलीच कल्पित कादंबरी या अद्भुत पेचाची कहाणी सांगतानाच; प्रिय मित्राची पत्नी होण्यासाठी आपले पुरुषी इंद्रिय अर्पण करणारा सोमवंत, अनेक पत्नी असलेला पण एका अप्सरेच्या शापामुळे तात्पुरते नपुंसकत्व आल्याने काही काळ स्त्रीरूप धारण करावे लागलेला धनुर्धारी अर्जुन, पौर्णिमेला देव असणारा आणि अमावास्येला देवी असलेला इलेश्वर हा देव आणि असे इतर अनेक; ज्यांना ना इकडे, ना तिकडे पण मध्येच कुठेतरी अडकले असताना आपला धर्म तरी काय, हा प्रश्न पडतो, अशा अनेकांच्या कहाण्या गुंफते.