गणित म्हटलं की, भल्याभल्यांची आकडेमोड होते. सर्वसाधारण मुलांना घाम फुटतो. लहानपणीच ज्यांचा पाया पक्का नाही, त्यांनी या विषयाची आवड निर्माण केलेली नसते. मात्र प्रज्ञावान विद्यार्थ्याला हे एक आव्हान वाटते आणि त्यात यश मिळाल्यावर होणारा आनंद हा एखाद्या योद्ध्याला मिळालेल्या विजयश्रीसारखा असतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करून गणिताची भीती दूर करण्याचे कार्य प्रस्तुत पुस्तकातील गमतीदार सुत्रं करतात. सोप्या व सहज गणित शिकण्याच्या पद्धती या विद्यार्थ्यांना उपयुक्त व मार्गदर्शक आहे.