पाच दशकांनंतर आपल्या देशात पुन्हा स्वदेशीची चळवळ उभी राहत आहे. या चळववळीत कमी भांडवलाचे आणि अधिक नफ्याचे असे अनेक छोटे छोटे उद्योग-व्यवसाय उभे राहत आहेत. उद्योग उभारू पाहणार्या नवोदित उद्योजकांमध्ये महात्माजींनी सांगितल्याप्रमाणे सेवाउद्योगात अनेकजण पुढे येत असल्याचे दिसत आहे. केवळ महात्माजींनी सांगितले म्हणून हे उद्योग उभारले जात नाहीत, तर व्यावसायिक कसोटीवरही ते अत्यंत उपयुक्त ठरलेले आहेत. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरील या
उद्योजकांना गांधीजीप्रणीत उद्योग-व्यवसायांचा एकत्रित परिचय करून द्यावा हा या पुस्तकात उद्देश आहे.