‘गमतीदार विज्ञान’ हे पुस्तक विश्वातील अनेक गोष्टींची वैज्ञानिक माहिती देते. अनेक ठिकाणी मानसशास्त्रीय विश्लेषणही करते. विश्वाच्या अफाट पसार्यामागची गूढता, त्याच्याशी झालेली मानवी मनाची गुंतवणूक आणि
सहभागता स्पष्ट करते. मानवी मनोव्यापारामागील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतानाच हे पुस्तक विज्ञानाच्या अभ्यासकांना आणि ज्यांना आपली वैज्ञानिक दृष्टी अधिक विकसित करावयाची आहे, त्यांना अत्यंत उपयुक्त आहे.