गाडगीळ क्षात्रवृत्तीचे प्रतिभावंत शापादपि शरादपि त्यांनी कथा कादंबरी प्रवासचित्रण समीक्षा असे अनेक वाङ्मय प्रकार आपल्या नवप्रतिभेने उजळून टाकले आपले एक युगच त्यांनी निर्माण केले नवकथा लिहिणार्या या प्रतिभावंताने नवसाहित्याचे सैद्धान्तिक समर्थन उपयोजित मूल्यमापन तर केलेच शिवाय अनेक नव्याजुन्या मराठी अमराठी साहित्यकृतींचे आपल्या सकस अभिरुचीच्या निकषावर नवमूल्यमापनही केले भारती निरगुडकर यांनी गाडगिळांची ही बहुदल समीक्षा साक्षेपाने जाणून घेऊन तिचा यथार्थ गौरव आणि तिचे सार्थ मूल्यमापन केले आहे.