भारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्त्रायल,-पॅलेस्टाइन असे देशादेशांमधील संघर्ष. सा-या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्या राहणा-या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या. भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत. जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणा-या संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे एका दिशेचा शोध