'शिक्षण आाणि व्यवसायात यशस्वी झालेली ती! मुंबई महानगरात उच्चभ्रूंचे जीवन आनंदात जगत होती. पण एके दिवशी दैवाने जबरदस्त तडाखा दिला. ती व्यक्तिगत दु:खाने विव्हल झाली, निराशेच्या खोल गर्तेत गेली. अवचित एका क्षणी तिच्या लक्षात आले, आपल्यापेक्षा अधिक दु:खी माणसे भोवती आहेत. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो. तिच्या निराशेला पंख पुâटले – त्यातून उभा राहिला ऑटिझमग्रस्त मुलांसाठी एक प्रकल्प. ती कहाणी – एक ‘इझम’... निरागस