एका कॉमन मित्राच्या ओळखीतून अभिव्यक्ती अनुरागच्या फ्लॅटमध्ये शेअर बेसिसवर राहायला येते आणि मग सुरू होतो दोन अजब गजब व्यक्तींच्या आयुष्याचा सफरनामा… दारूपार्ष्या, सुट्टा, रात्र रात्र जागून गप्पा, जुन्या गाण्यांचा नॉस्टॅल्जिआ, सुख-दुःखातली सोबत, सगळंच चिलॅक्स आयुष्य !
एकमेकांच्यात इमोशनली इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं खरं, पण हळूहळू ते एकमेकांकडे आपल्या मनातल्या नाजूक, हळव्या जखमा उघड करतात… जवळ येऊ लागतात… आणि मग सुरू होते गुंतागुंत… ओढाताण… मनांची, शरीरांची… भांडणं, अबोला, राग, चिडचिड अशा साऱ्यांतून त्यांचं नातं तावून-सुलाखून निघतं का? त्यांच्या नात्याच्या गाठी सुटतात की गुंततच जातात ?
मैत्री, प्रेम, दुश्मनी असं कोणतंही नाव देण्यापलीकडे गेलेल्या नात्याची…