विसाव्या शतकातील समीक्षाविचाराचा अभ्यास करताना बडोद्यात झालेला समीक्षाविचार महत्त्व धारण करतो.
सयाजी महाराजांच्या वाङ्मय व संस्कृतीपोषण धोरणामुळे आणि उदार आश्रयामुळे विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत बडोद्यात फार महत्त्वपूर्ण असा समीक्षाविचार झाला आणि त्याला अनेक समीक्षकांचे गंभीर योगदान होते.
कै. ग. रं. दंडवते हे त्यांच्यापैकीच एक. तथापि त्यांचा समीक्षाविचार गरजेपुरताच पाहिला - अभ्यासला गेला आणि एकप्रकारे ते अलक्षित राहिले. वास्तविक आधुनिक मराठी वाङ्मयाचा, मराठी कादंबरीचा अन् मराठी नाटक व रंगभूमीचा पहिलावहिला मराठी वाङ्मयेतिहास लिहिला तो याच कै. ग. रं. दंडवते यांनी. त्यांच्या प्रयत्नांचे महत्त्वमापन करणारे हे डॉ. मृणालिनी कामत यांचे पुस्तक मराठी अभ्यासकांच्या पदरात नवीनच काही टाकू शकेल असा विश्वास वाटतो.