‘ज्ञान-विज्ञानाच्या देशात’ हे डॉ. जनार्दन वाघमारे यांचे पुस्तक त्यांच्या इंग्लंड, अमेरिका व कॅनडाच्या शैक्षणिक दौर्यावर आधारलेला आहे. प्रस्तुत पुस्तकात अमेरिका, इंग्लड व कॅनडामधील शिक्षण पद्धतीबरोबरच त्या ठिकाणच्या सामाजिक व सांस्कृतिक संस्था, समाजजीवनाचा व त्यातील गुंतागुंतीचे प्रश्न यांचा अभ्यास व त्यासंबंधीची निरीक्षणे लेखकाने नोंदविली आहेत. एकूणच ज्ञानकेंद्रीत समाज आणि विज्ञानसत्ताक राष्ट्र म्हणून ज्यांना ओळखली जातात अशा राष्ट्रांतील विद्यापीठांना, महाविद्यालयाना डॉ. वाघमारे यांनी भेटी दिल्या. प्राध्यापक, प्रशासक, संशोधक व विद्यार्थी यांच्याशी संवाद केला. यामुळे हे पुस्तक म्हणजे केवळ प्रवासवर्णन नाही, तर अभ्यासयात्राचा आहे. शिक्षणशास्त्राचे अभ्यासक व सामान्य वाचकांना हे पुस्तक सर्वार्थाने मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.