उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी
Dhyan Kamale by Osho
Description
Description
ध्यान करणे हे एके काळी फक्त देव-देव करणाऱ्या वृद्धांचे काम आहे असे मानले जायचे; पण आधुनिक काळातील जीवनात वाढलेल्या संकीर्णतेमुळे मनावरील ताण कमी करण्यासाठी ध्यान सगळ्या आबालवृद्धांसाठी उपयुक्त आहे हे सगळ्यांनाच पटू लागले आहे. जीवन कसे जगावे किंवा मनःशांतीसाठी ध्यान कसे करावे याविषयी वेगवेगळे संप्रदाय वेगवेगळ्या पद्धती सांगतात.ओशोंनी त्यांच्या प्रवचनांमध्ये त्यांची स्वतःची अशी खास ध्यानपद्धती विकसित केली आहे. ‘ध्यानकमळे’ या पुस्तकात त्यांच्या दहा प्रवचनांचे संकलन केले आहे. ज्यामध्ये ध्यान म्हणजे काय? ते कसे करावे? कोणत्या गोष्टी पाळाव्या आणि कोणत्या टाळाव्यात यांचे सविस्तर वर्णन केले आहे. अत्यंत रसाळ शैलीतील ही प्रवचने केवळ अध्यात्माच्या वाटेवर जाणाऱ्यालाच नव्हे तर प्रत्येक लहानथोर व्यक्तीला उपयोगी पडणारी आहेत. कारण त्यात सांगितलेले मानसिक विरेचन हे सगळ्या शारीरिक आणि मानसिक व्याधींना बरे करणारे एक अद्भुत उपचारक आहे.तसेच आधुनिक काळात संन्यासाचा बदललेला अर्थ कोणता? जीवनाचा पाया कसा आहे? द्वैताकडून अद्वैताकडे कसे जावे? : मनाचा मृत्यू म्हणजे काय? परमेश्वराच्या दारी कसे जावे या अवजड वाटणाऱ्या प्रश्नांना ओशोंनी दिलेली सोपी सरळ उत्तरे अत्यंत मननीय तर आहेतच; पण ही तत्त्वे आपल्या जीवनात आचरून आपणही एक उदात्त जीवन जगू शकतो.
- नियमित किंमत
- Rs. 135.00
- नियमित किंमत
-
Rs. 150.00 - विक्री किंमत
- Rs. 135.00
- युनिट किंमत
- / प्रति
-10%
शेअर करा
हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
Dhyan Kamale by Osho