प्रस्तुत पुस्तकात बळवंत कांबळे यांचा देवदासी, पोतराज आणि वाघ्या-मुरळी यासंबंधी सखोल अभ्यास अनुभवास येतो. धर्म, समाज आणि संस्कृती यांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेले समाजजीवनातील पेच आणि अनिष्ट प्रथा यांचा त्यांनी उहापोह केला आहे. आपल्या ह्या संशोधन प्रकल्पाला त्यांनी आजचा सामाजिक आशय व परिवर्तनाचा संदर्भही दिला आहे. हे ह्या पुस्तकाचे वेगळे वैशिष्टय. महाराष्ट्राच्या पारंपारिक समाजजीवनाची ओळख करून देणारे हे पुस्तक लोकसाहित्याच्या व समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त आहे.