देवाज्ञा या शब्दाला एक लौकिक सांकेतिक अर्थ आहे; पण श्री. धारप त्याचा शब्दश: अर्थ घेतात आणि एक कथा रचतात. वातावरणनिर्मिती, तर्कशुद्धता आणि कार्यकारणभावाची भक्कम शृंखला – श्री. धारपांचे हे लेखनविशेष याही कादंबरीत आहेतच. वाचकाला आपला अविश्वास क्षणभर खुंटीला टांगून ठेवायला लावायची किमया केवळ धारपांनीच करावी. मृत्यूच्या कल्पनेभोवती भीतीचं एक विलक्षण वलय आहे आणि गूढताही आहे. मृत्यूचा दाहक स्पर्श क्षणमात्र झाला तर – ? ही मध्यवर्ती कल्पना या कादंबरीत आहे. तसेच कादंबरीचा शेवट झाला अशा समजुतीत वाचक असताना श्री. धारप कथानकाला अशी काही विलक्षण कलाटणी देतात की वाचक अवाक व्हावा !