'बाळासाहेब विखे पाटील या आत्मकथनात केवळ ‘स्व’ची कहाणी सांगत नाहीत; तर आपल्याबरोबर आपला समाज, आपले लोक व त्यांच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचेही मार्मिक विवेचन ते करतात. किंबहुना त्यांच्या आत्मचरित्राला भव्य अवगुंठन आहे, ते आधुनिक भांडवलशाही व अर्थकारण यांच्या झपाट्यात सापडलेल्या भारतीय कृषक समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईचे. म्हणूनच हे पुस्तक मराठी आत्मकथनात विशेष असे उठून दिसू शकते. लेखकाने आयुष्याच्या वाटचालीत पाहिलेले विशाल जग, विविध विषय, त्यांची हाताळणी, निवेदनाच्या शैलीचा मोकळा, सडेतोड, थोडासा ग्रामीण ढंगाने येणारा बाज हे सगळे वेगळेच रसायन आहे. अरुण साधू'