मैत्रेयीला तसा नेहमी-नेहमी दात घासण्याचा कंटाळा येत नसे,
पण कधी-कधी येतही असे. त्यात पुन्हा जिभेची भर.
तोंडात दात कशासाठी असतात, ते मैत्रेयीला माहीत होतं,
पण जीभ कशासाठी असते हे मात्र माहीत नव्हतं.
तोंड म्हणजे काय…
दोन ओठ, त्यांच्या आत दाढा, दात, जीभ…
तोंडाने आपण खातोपितो आणि बोलतो-गातोही.
म्हणजे एकच तोंड दोन कामं करतं.
पण अशी दोन-दोन कामं करणं तोंडाला कसं काय बुवा जमतं?
मैत्रेयीच्या डोक्यात प्रश्नांची फौज उभी राहिली.
मग तिच्या मदतीला आले आई-बाबा, आजी-आजोबा
आणि अर्थातच कॉम्प्युटरराव!