योगसाधना हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. शरीर व मनाच्या आरोग्यासाठी योगसाधना औषधासारखे काम करते. नियमित योगसाधनेमुळे रोगप्रतिकारशक्तीत वाढ होऊन, आरोग्यसंपन्नता येते. अनेक गंभीर आजारांत सहायक उपचारपद्धती म्हणून योगाभ्यासाचे महत्त्व अनेक नामवंत तज्ज्ञ डॉक्टरही मान्य करीत आहेत.कार्यक्षमता वाढणे, दीर्घायुषी होणे असे अनेक फायदे होतात. प्रस्तुत पुस्तकात उत्तम स्वास्थ्यासाठीची योगसाधना व सामान्य आजार योगाने कसे बरे करता येतील, याविषयी उपयुक्त माहिती दिली आहे.