‘..या सुमाराला मला दारावर थाप ऐकू आली. दिवसाउजेडी दार वाजणं म्हणजे काही अशुभाची चाहूल नव्हे, हे मला ठाऊक होतं. त्यामुळे कोण असावं, हे बघायला मी खाली आलो. पण या वेळी मात्र माझा होरा साफ चुकला. बाहेर सशस्त्र तरूण उभे होते. माझं काळीज लक्कन हललं. डायरीची पानं लपवायला मी आत धावलो आणि दारावरच्या धडकांचा आवाज माझ्या कानांवर आदळू लागला... २३ ऑगस्ट १९९०.’