करोना मुळे प्रथम ‘लॉकडाउन’ घोषित केला गेल्यावर पहिल्या आठ दिवसांत शहरातील सामान्य नागरिकांच्या मनाची झालेली घालमेल ते सैरभैर होऊन गावाकडे निघालेल्या विस्थापित श्रमिकांची झालेली परवड अशा विविध घडामोडींची दोन भिन्न आकृतिबंधामधून नोंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन दीर्घकथा .अचानक निर्माण झालेल्या असामान्य स्थितीमुळे परस्परांतील विश्वास वाढतो की , संदेह बाजूला ठेवण्यास माणसं सहजप्रवृत्त होतात, त्याचा वेध घेऊ पाहणारी संदेहकथा … लॉकडाउन’मधील हत्येचं रहस्य.पक्ष्यांचे थवे काही एक सामंजस्याने मार्गक्रमण करत असतात. ” त्या आठ दिवसांत जनजीवनात अचानक संभवलेल्या बदलांनी तेही सैरभैर झाले. स्थलांतरित, नागरी, जंगली, निवासी अशा विविध पक्ष्यांनी मिळून लोकशाही पद्धतीने समिती गठित केली आणि त्या बदलांचा धांडोळा’ घेतला ! पक्षीगणाच्या नजरेतून दिसून आलेली स्थिती चितारणारी विहंगावलोकनी रूपककथा …पक्षी – चंक्षूकरोनागस्ती तून करोनागस्ती .