मनाला अतिशय भावणा-या हृदयस्पर्शी, स्पूर्तिदायक अशा पुढील कथांचा तुम्हाला आनंद प्राप्त करून देण्यासाठी सादर आहे तुमच्या आवडत्या ‘चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकाचा पाचवा भाग! मानवी आयुष्याला व माणुसकीला मानाचा मुजरा करणा-या या कथारूपी पुष्पगुच्छाचा सुगंध प्रत्येकाच्या मनात दरवळेल व असाच अनेकांच्या मनात दरवळत जाऊन सा-या पृथ्वीतलावर सुगंधित वातावरण निर्माण होईल,शांती प्रस्थापित होईल अशी खात्री आहे. हे ‘चिकन सूप’ चव घेत घेत चमचा-चमचा पिऊ शकता. हवं तर वाडगाभर सूप प्राशन करू शकता आणि वाटलंच तर सूपचं भरलेलं पूर्ण पातेलंच एका बैठकीत संपवू शकता! या भागातील सामान्य लोकांच्या जीवनातले असामान्य अनुभव वाचताना एखाद्या वेळी तुम्हाला आलेल्या अनुभवाची आठवण जागी होईल आणि मग त्या कथेचा खरा गर्भितार्थ तुमच्या मनाला अधिक चांगल्या प्रकारे स्पर्श करून जाईल. एक लक्षात ठेवा – तुमच्या व तुमच्या जिवलगांच्या आयुष्यात प्रेमासाठी, स्पूर्तीसाठी भरपूर जागा आहे. तेव्हा ह्या पाचव्या भागातील कथांचा ठेवा मनात जरूर जपून ठेवा.
THIS TREASURY IS A TRIBUTE TO LIFE AND HUMANITY, WITH TOPICS RANGING THE ENTIRE EMOTIONAL AND EXPERIENTIAL GAMUT. THE NATURE OF THE STORIES INVITES YOU TO ENJOY CHICKEN SOUP IN WHATEVER WAY YOU FIND MOST COMFORTING - BY THE SPOONFUL, BY THE BOWL, OR THE WHOLE POT IN ONE SITTING.