{"product_id":"chhoti-aai-anant-vaikar-छोटी-आई-अनंत-वाईकर","title":"Chhoti Aai - Anant Vaikar \/ छोटी आई - अनंत वाईकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. अनंत वासुदेव वाईकर यांची 'छोटी आई' ही एक कौटुंबिक कादंबरी आहे. 'छोटी आई' या कादंबरीतली आई प्रेमळ, कर्तव्यनिष्ठ, आदर्शवादी, त्यागी स्त्री आहे. सावत्र आईचं साहित्यातून, जनमानसातून नेहमीच काळंकुट्ट चित्र रंगवण्यात येतं. रामायणातील कैकेयीपासून ही परंपरा चालू आहे. पण या पूर्वग्रहाला एक वेगळाच छेद देण्याचा स्तुत्य प्रयत्न प्रा. वाईकर यांनी केला आहे. 'सावत्र आई वाईटच असते' हा सिद्धांत होऊ शकत नाही. प्रा. वाईकरांनी हाच धागा पकडून कादंबरीची रचना केलेली आहे. त्यांची निवेदनशैली चित्रमयी आहे. अनाथाश्रमात वाढलेली आणि आई-वडिलांचं प्रेम न लाभलेली प्रमिलाताई एका विधुराच्या संसारात प्रवेश करते आणि त्याच्या दोन मुलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न सतत करत राहते. स्वतःला अपत्य होऊ देण्याचं ती टाळत राहते. आपल्या पतीच्या संसारात तर ती साथ देतेच; पण प्रसंगी वाट चुकणाऱ्या सासुबाईंनाही सावरून घेते. हा सारा तपशील प्रा. वाईकरांनी आत्मीयतेने मांडला आहे. या कादंबरीला वाचनीयता प्राप्त झाली आहे, ती या कादंबरीच्या भावस्पर्शित्वामुळेच. प्रा. वाईकरांनी मानवी जीवनातील गुंतागुंतीचा अधिक खोलवर जाऊन शोध घ्यावा आणि आपल्या लेखनास अधिक सघनता प्राप्त करून द्यावी, असं मला प्रांजळपणे सुचवावंसं वाटतं\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":53247898026302,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/files\/4230.jpg?v=1774959595","url":"https:\/\/rasiksahitya.com\/mr\/products\/chhoti-aai-anant-vaikar-%e0%a4%9b%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%88-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rasik Sahitya LLP","version":"1.0","type":"link"}